हातात तलवार घेवून फिरणाऱ्याला पकडले
गंगापूर, (प्रतिनिधी) : हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला आज रविवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पोलिसांनी पकडले. छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर वैजापूर रोडवर महावितरण सबस्टेशनच्या समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये ही कारवाई केली.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात शाहराम पंढरीनाथ भवार (वय ३० वर्ष रा. समतानगर, गंगापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडे असलेली एक तलवार जप्त केली आहे.
गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या गंगापूर पोलिसांसमवेत गस्त घालीत होते. यावेळी एक व्यक्ती गंगापूर वैजापूर रोडवर महावितरण सबस्टेशनच्या समोर असलेल्या एका हॉटेलसमोर बेकायदेशीर तलवार घेऊन संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखे पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेतली आणि तरुणाला ताब्यात घेतले.
या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे फिर्यादी पोहेकॉ वाल्मिक दौलतराव निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी शाहराम पंढरीनाथ भवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास गंगापूर पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल झांजुर्णे, इंगळे, अंमलदार पोना विठ्ठल जाधव हे करत आहे. आरोपीकडून ५५०० रु. किंमतीची २६ इंच लांबीची दीड इंच रुंदीची जिला चार इंच लांबीची पितळी नक्षीदार मुळ असलेली लोखंडी धारदार पात्याची तलवार जिस एक चॉकलेटी रंगाची मॅन तिला पिवळा पट्टा व पिवळ्या रंगाची कडी व साखळी असलेली जुनी तलवार जप्त केली आहे.